महाराष्ट्रात 14 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!
![The number of corona victims in the state is 25,64,881](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/1800x1200_coronavirus_1.jpg)
महाराष्ट्रात मागील 24 तासात 23,371 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 14 लाख 15 हजार 658 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 87.51 % आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Screenshot_20201021-2025522.png)
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 8,142 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 31 हजार 719 वर पोहचली आहे. सध्या 16 लाख 17 हजार 658 रुग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी दिवसभरात 180 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 42 हजार 633 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.64 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 83 लाख 27 हजार 493 नमुन्यांपैकी 16 लाख 17 हजार 658 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24 लाख 47 हजार 292 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 23 हजार 312 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.