Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
महाराष्ट्रात ई-वे बिल प्रणाली सक्तीची
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/e-way-bill-.jpg)
मुंबई : महाराष्ट्र शासनाने दि. ७ मे २०१८ रोजी अधिसूचना जारी केली असून त्यानुसार महाराष्ट्रातील राज्यांतर्गत मालाच्या वाहतुकीसाठी ई-वे बिल दि. २५ मेपासून अनिवार्य करण्यात आली आहे, सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन वस्तू आणि सेवा कर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वस्तू आणि सेवा कर पद्धती ही देशपातळीवरील पहिली एकसमान कर पद्धती आहे. ई-वे बिल प्रणाली ही वस्तू आणि सेवा कर पद्धतीचा महत्त्वाचा घटक असून राज्यांतर्गत वाहतुकीसाठी ई-वे बिल प्रणालीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.