breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 17 लाखांच्या पार

  • मुंबईत 841, पुण्यात 543 नवे कोरोना रुग्ण

मुंबई – गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या 5,246 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 17,03,444 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 11,277 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 117 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 15,51,282 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 44,804 वर पोहोचला आहे. तसेच सध्या 1,06,519 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 841 नवे रुग्ण आढळले, तर 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,61,684 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,374 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 1,929 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, त्यामुळे मुंबईत आतापर्यंत 2,35,207 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 15,466 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 543 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,26,527 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 8,016 इतका झाला आहे. तसेच काल 624 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,07,298 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 5,497 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 543 रुग्णांपैकी 228 रुग्ण हे पुणे शहरातील असून 131 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत, तर 138 रुग्ण ग्रामीण भागातील आणि 46 रुग्ण कंटेन्मेंट झोनमधील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button