महाराष्ट्रमुंबई
महायुती 220 जागा जिंकेल – चंद्रकांत पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/Chandrakant-Patil-696x392.jpg)
मुंबई – युतीची घोषणा लवकरच होणार असून विधानसभा निवडणुकीत महायुती किमान 220 जागा जिंकेल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भाजपा-शिवसेना युतीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपा प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढणार आहे. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेले काम आम्ही जनतेसमोर मांडू.