मस्जिदमध्ये 10 विदेशी नागरिकांना थारा देऊन संचारबंदीचे उल्लंघन, दोघांवर गुन्हा दाखल
![Crime of killing goon Gajanan after his release from Taloja jail](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/crime7.jpg)
नेवासा येथे विदेशी व्यक्तींना मस्जिदमध्ये ठेऊन जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पठाण जुम्माखान नवाबखान आणि सलिम बाबुलाल पठाण दोघेही नेवासा गावाचे रहिवाशी आहेत. राज्यात संचारबंदी लागू असतांना पोलिसांना मज्जिदमध्ये विदेशातील 10 जण राहत असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मज्जिदमध्ये जाऊन पाहणी केली असता तेथे 10 नागरिक आढळून आले. या विदेशी नागरिकांमध्ये जिबुती देशातील 5 बेनिन देशातील 1, डेकॉर्ट देशातील 3, आणि घाना देशातील 1 नागरिक आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. देशात कोरोना व्हायरसची खबरदारी म्हणून संचारबंदी लागू केली असतांना देखील विदेशी नागरिकांना मस्जिदमध्ये थारा दिल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.