मशिदीत नमाजसाठी गर्दी; २९ जणांवर गुन्हे दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/muslim.jpg)
संगमनेर: करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभर तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू केला आहे. लोकांनी एकत्र येण्याला आणि गर्दी करण्याला मनाई करण्यात आलेली असतानादेखील अनेक जण ही सूचना धुडकावून लावताना दिसत आहेत. संगमनेर शहरातील नाटकी परिसरातील इस्लामपुरा मशिदीत अशाच २९ जणांवर सामूहिक नमाज पठण केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी रोषण पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२६ मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास शहरातील इस्लामपुरा मशीद नगर रोड याठिकाणी जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करीत सलमान अब्दुल शेख (वय ३५, रा. इस्लामपूर, संगमनेर), माजीद हरून शेख (वय ३३, रा. नाईकवाडपुरा, संगमनेर), आजीमखान नासिरखान खान (वय ३८, रा. रहेमतनगर संगमनेर), निजामुद्दीन फकीर मोहमद तांबोळी (वय ५९, रा. करुले, ता. संगमनेर), चांद अब्बास (वय ६५, रा. मेंढवण, ता. संगमनेर), शोएब शाबीर खतीन (वय २२, रा. सुकेवाडी रोड संगमनेर) तसेच पळून गेलेले मौलाना अकिल शकिर काकर, सलीम मिश्री व इतर १५ ते २० जणांनी एकत्र येत नमाज अदा केला होती.