Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
मराठा समाजाला सरकारने फसविले ; मराठा क्रांती मोर्चाची बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/2Maratha_Kranti_Morcha_18.jpg)
मुंबई – राज्यात मराठा क्रांती मोर्चाने शांततेत 58 आदर्श मूक मोर्चे काढले. मात्र सरकारने फसव्या घोषणा व फसवे आदेश काढून मराठा समाजाची फसगत केल्याचा आरोप करत सरकारविरोधात पुढची रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली. याकरिता मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बैठक घेण्यात आली.
ही बैठक 28 एप्रिलला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सकाळी दहा वाजता घेण्यात आली. यामध्ये सरकारच्या फसव्या आदेशांची होळी करणे व शांततेच्या मार्गाने काढलेला मूक मोर्चा संपवून पुढची दिशा ठरविण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय समितीचे आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील, माणिकराव शिंदे यावेळी उपसि्थत होते.