मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे आज जलसमाधी आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/maratha_1594024454.jpg)
गंगापूर । मराठा आरक्षण आणि इतर मागण्यासाठी मराठा युवक काकासाहेब शिंदे यांनी जुने कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली होती. या घटनेला आज गुरुवारी 23 जुलै रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहे. आज गुरुवारी सकाळी 6 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत या मार्गवरील वाहतूक वळविण्यात आली आहे. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.
औरंगाबाद- पुणे राष्ट्रीय मार्गावरील गोदावरी नदीच्या पुलावर मराठा आरक्षण आणि इतर मागण्यासाठी मराठा युवक गंगापूर तालुक्यातील अगर कानडगाव येथील रहिवासी गरीब कुटुंबातील काकासाहेब शिंदे यांनी जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात 23 जुलै 2018 उडी घेऊन जलसमाधी घेतली होती. या घटनेला आज गुरुवारी 23 जुलै रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी विविध मागण्यांसाठी जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावर बलिदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संदीप गावित व पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.