मध्य, हार्बरवर आज ‘ब्लॉक’
आज, २४ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक नाही. मध्य रेल्वेवर सकाळी ११.२० ते सायंकाळी ३.५० पर्यंत माटुंगा ते मुलुंडदरम्यान आणि हार्बर लाइनवर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.१० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन आणि चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप मार्गावर मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे
* शनिवारी मध्यरात्री वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर तसेच ००.३० वाजल्यापासून ०४.०० पर्यंत साडेतीन तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकलचा खोळंबा होऊ शकतो.
मध्य रेल्वे
* रविवार, २४ फेब्रुवारी सकाळी ११.२० ते सायंकाळी ३.५० ल्ल कुठे – माटुंगा ते मुलुंड ल्ल परिणाम – विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकांत लोकल थांबणार नाहीत. माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद लोकल सेवा सुरू असेल. * सकाळी ११ ते ५ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सुटणाऱ्या सर्व लोकल १० मिनिटे उशिराने धावतील. ल्ल कर्जत-खोपोली दरम्यान दुरुस्तीकामांसाठी सकोळी ९ ते दुपारी २ पर्यंत पॉवर ब्लॉक.
हार्बर मार्ग
* कधी – २४ फेब्रुवारी, सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.१० ल्ल कुठे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन आणि चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप * परिणाम – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेल तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वांद्रे/ गोरेगावला जाणाऱ्या लोकलसेवेचे वेळापत्रक कोलमडेल.