Breaking-newsमहाराष्ट्र
मंदिरात तोगडे कपडे न घालण्याच्या आवाहनावर देवस्थान समिती ठाम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/Mahalaxmi.jpg)
- तृप्ती देसाई या चोप द्यायला आल्या तर आम्ही रणरागिणी जशासतास उत्तर द्यायला तयार
कोल्हापूर- करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी तोकडे कपडे घालून येऊ नये असं आवाहन दोनच दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केलं होतं. त्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. आज पुन्हा देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर आणि देवस्थान समितीच्या सदस्य संगीता खाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवस्थान समितीने केलेल्या मंदिरात तोगडे कपडे न घालण्याच्या आवाहनावर देवस्थान समिती ठाम असल्याचं सांगितलेलं आहे. जर कोणी तोकडे कपडे घालून मंदिरात आलं तर त्यांना सुरुवातीला आम्ही विनंती करणार, तसंच मंदिरात प्रवेश करत असताना महिलांसाठी साडी आणि पुरुषांसाठी पंचा देऊन मंदिरात प्रवेश करण्याची विनंती करणार आहेत. तसेच यासाठी वेगवेगळ्या चेंजिंग रूम ची व्यवस्था देवस्थान समितीच्या वतीने करण्यात येणार असल्याचं वैशाली क्षीरसागर यांनी सांगितलेला आहे. तसंच तृप्ती देसाई या चोप द्यायला आल्या तर आम्ही रणरागिणी जशासतास उत्तर द्यायला तयार आहोत अस देखील या समिती सदस्यांनी म्हंटल आहे.