breaking-newsपुणेमहाराष्ट्र

भुशी डॅम होतो आहे मद्यपींचा अड्डा

सर्वांना प्रतीक्षा असलेल भुशी धरण सोमवारी सकाळी ओव्हरफ्लो झालं आहे. यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. परंतु, भुशी धरण हे मद्यपींचा अड्डा बनलंय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अबालवृद्धासह या पर्यटनस्थळी तरुण तरुणी आपल्या कुटुंबासमवेत येत असतात. मात्र, सर्रास पणे भुशी धरणाच्या पायऱ्यांवर काही टवाळखोर मद्यपान केल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लोणावळा शहर पोलीस काय करत आहेत असा येथील पर्यटकांना आपसूकच प्रश्न पडत आहे.

अनेक पर्यटकांची पावलं निसर्गरम्य ठिकाणी वळू लागली आहेत. पुण्याच्या शेजारीच महत्वपूर्ण अस निसर्ग सौंदर्य लाभलेल लोणावळा हे पर्यटनस्थळ म्हणून गेली कित्येक वर्षे झालं आपण पहात आहोत. तर त्याच परिसरातील भुशी धरण हे पर्यटकांना हवंहवंस आणि तितकंच आकर्षित करणारं ठरतं आहे.

धरणाची जशी लोकप्रियता वाढत आहे तशी टवाळखोर तरुणांचा भरणा या ठिकाणी होत आहे. हातात मद्याच्या बाटल्या आणि नागमोडी वळण घेऊन चालताना दिसत आहेत. त्यामुळे निसर्ग रम्य अस असलेल्या या ठिकाणाला गालबोट लागत कामा नये अशी मागणी होते आहे. टवाळखोरांकडून तरुणीची छेडछाडीचे प्रकार घडतात. त्यामुळे अशा ठिकाणी कुटुंबीयांसमवेत पर्यटनाचा आनंद घ्यायचा की नाही हा प्रश्नच  पडल्याशिवाय राहात नाही. विशेष म्हणजे भुशी धरण येथे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी पाहण्यास मिळत नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button