Breaking-newsमहाराष्ट्र
भीषण आगीत पोलीस आवारातील जप्तीच्या गाड्या जळून खाक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/789.jpg)
सोलापूर, (महा-ई-न्यूज) – पोलीस आयुक्तालयाच्या आवारातील बझार पोलीस ठाण्यात ठेवलेल्या जप्तीच्या गाड्या भीषण आगीत जळून खाक झाल्या आहेत. याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत जवळपास 300 गाड्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट उठत होते. अखेर अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनी अगीवर वेळीच नियंत्रण मिळविले.