breaking-newsमहाराष्ट्र

बुलडाणा: मेहकरजवळ बोलेरो-कंटेनरचा भीषण अपघात, 4 जण ठार

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ बोलेरो व कंटेनरच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर-औरंगाबाद अंजनी खुर्द नजीक मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादच्या कन्नड येथील क्षीरसागर कुटुंब मुलासाठी मुलगी पाहायला गेले होते. शनिवारी रात्री नागपूरवरून बोलेरो (क्रमांक एम-एच-२०- ई-ई- ६७४६) ने औरंगाबादकडे निघाले होते. परत येत असताना हा अपघात झाला. मेहकरकडून येणाऱ्या कंटेनर (क्रमांक एम-एच- २६- ए-डी- ३५४१) ची व बोलेरोची समोरा-समोर जबर धडक झाली. या अपघातात आई, वडील, मुलगी, व बोलेरो चालवणारा चालक जागीच ठार झाले.

या अघपातात बोलेरो गाडी चक्काचूर झाली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतांचे पार्थिव जवळील सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आल्याची माहिती असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button