breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीड, परभणी, नांदेड, नगरसह सहा जिल्ह्यांमध्ये ‘नारी’तर्फे रॅपिड टेस्ट

जळगाव | देशात काेविड-१९ चा फैलाव वेगाने हाेत आहे. काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी लवकर निदान हाेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पुणे येथील आयसीएमआरची शाखा असलेल्या ‘नारी’ या संस्थेतर्फे १८ मेपासून तीन दिवस राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये काेराेनाची रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे. ही रॅपिड टेस्ट राज्यात जळगावसह, बीड, परभणी, नांदेड, अहमदनगर व सांगली या सहा जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे.

देशात विषाणू तपासणी व संशाेधनासाठी कार्य करणाऱ्या पुणे येथील आयसीएमआर (इंडियन काैन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च) या संस्थेचा भाग असलेल्या नारी (नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट) ही संस्था राज्यातील ६ जिल्ह्यांत टेस्ट करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील दहा गावांमध्ये ही रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यास्तरावरील यंत्रणेला साेबत घेऊन जिल्ह्यातील निश्चित केलेल्या गावात रँडमली नागरिकांची तपासणी करून सॅम्पल घेणार आहेत. हे सॅम्पल पुणे व्हायरालाॅजी विभागाला पाठविणार आहे. तर, त्याचा अहवाल केंद्राला पाठविण्यात येणार आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांच्या रॅपिड टेस्टसाठी आयएमआरसीचे संचालक तथा पुणे येथील टीबी आणि कृष्ठराेग विभागाच्या सहसचिव डाॅ. पद्मजा बनगर यांची राज्याच्या नाेडल ऑफिसर म्हणून नियुक्ती होईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button