breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बालमैत्रिणीशी हार्दिक पटेलने बांधली लग्नगाठ!

अहमदाबादः  गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल  आज 27 जानेवारीला विवाहबंधनात अडकला. हार्दिकने त्याची बालमैत्रीण किंजल पारीख हिच्याशी विवाह केला. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसर गावातील एका मंदिरात हा विवाहसोहळा मौजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

हार्दिक यांच्या लग्नासाठी दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणी अशा काही महत्त्वाच्या लोकांनाच निमंत्रण देण्यात आले होते. अहमदाबाद जिल्ह्यातील विरामगाम तालुक्यातील चंदननगरी परिसरात हार्दिक आणि किंजल हे अनेक वर्षे राहायचे. किंजल ही कॉमर्स शाखेची पदवीधर असून पुढचे शिक्षण घेत आहे.

सुरेंद्र नगर जिल्ह्यातील दिगसर गावातील हार्दिक पटेल यांच्या कुलदेवतेच्या मंदिरात हा विवाह सोहळा संपन्न झाला. हार्दिक यांचे वडील भरत पटेल यांनी याआधी ‘हार्दिकने लवकरात लवकर विवाहबद्ध व्हावे अशी सर्वांचीच इच्छा होती. किंजल ही पारीख-पटेल असून पाटीदार समाजाचीच आहे’ असेही त्यांनी सांगितले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button