breaking-newsमहाराष्ट्र

बालभारतीची आठवीची पुस्तके बाजारात

  • शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उपलब्ध करूर देण्याचा दावा

पुणे – बालभारतीकडून यंदा नव्याने येणाऱ्या इयत्ता आठवीची काही पुस्तके बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहेत; तर लवकरच इयत्ता पहिलीचीही पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे बालभारतीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दरम्यान शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तके शाळेतच उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही बालभारतीने स्पष्ट केले आहे.
दैनिक “प्रभात’ने नुकतेच याबाबत वृत्त प्रसिध्द करत अद्यापही बाजारात इयत्ता पहिली व आठवीची नवी पुस्तके दाखल झाले नसल्याचे समोर आणले होते. त्यावर बालभारतीकडून एक पत्रक काढत ही माहिती देण्यात आली आहे. या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे यंदा इयत्ता दहावी, पहिली व आठवीचा अभ्यासक्रम बदलला आहे. दहावीची पुस्तके या आधीच सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत; तर इयत्ता आठवीची काही पुस्तके देखील 14 मेपासून आम्ही विक्रेत्यांकडे उपलब्ध करून दिली आहेत. इयत्ता पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम वेगाने सुरू असल्याचेही बालभारतीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, यंदाही विद्यार्थ्यांना खात्यात पैसे देण्याऐवजी त्यांच्या हातात पुस्तके दिली जाणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांच्या हातात पुस्तके असतील, अशी हमी बालभारतीकडून देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button