breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

प्रसिद्ध फाईट मास्टर वीरू देवगण यांचे निधन

हिंदी सिने सृष्टीतील प्रसिद्ध फाईट मास्टर वीरू देवगण यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

वीरू देवगण काही दिवसांपासून आजारी होते. श्वसनक्रियेत अडथळा येऊ लागल्याने त्यांना सोमवारी सकाळी सांताक्रुझ येथील सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पुत्र अभिनेता अजय देवगण, अनिल देवगण, दोन मुली, सून काजोल आणि नातवंडे असा परिवार आहे.

मि. इंडिया, मि. नटवरलाल, लाल बादशाह, हिम्मतवाला, शहेनशाह यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी वीरू देवगण यांनी अ‍ॅक्शन दिग्दर्शन केले होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ६ वाजता विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संजय दत्त, शाहरुख खान, बॉबी देओल यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button