breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

पुणे – कार गाडी चेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला धक्काबुकी, शिवीगाळ आणि किरकोळ मारहाण करणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.मुजुमदार यांनी दिला आहे.
निशांत बाबुराव वाकडकर (वय 35, रा. वाकड) आणि सागर मोहन निकम (वय 22, रा. दाभाडी, ता.मालेगाव, जि. नशिक) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई विकी विश्‍वनाथ निकम (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 20 जुलै) सायंकाळी 7.50 च्या सुमारास वाकड येथील इन्फोटीक इन सोसायटी समोर घडली. फिर्यादी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना संशियितरित्या स्वीफ्ट कार जाताना दिसली. ती गाडी थांबवण्यास फिर्यादींनी सांगितले. मात्र, फिर्यादींच्या अंगाजवळ आणून न थांबता पळून जावू लागले. फिर्यादींनी दुसरी गाडी आडवी घालून कार थांबविण्यास भाग पाडले. त्यावेळी आम्ही गाववाले आहोत, तुम्ही आमची गाडी चेक करणारे कोण, अशी विचारणा करत फिर्यादींना धक्काबुक्की करण्यात आली. त्यांच्या युनिफॉर्मचे दोन बटणे तोडून त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्याबाबत सखोल तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केली. तर बचाव पक्षातर्फे ऍड. सुचित मुंदडा यांनी काम पाहिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button