breaking-newsमहाराष्ट्र

पेण अर्बन बँक घोटाळा: माजी अध्यक्षाला अटक, ‘ईडी’ची कारवाई

रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बँकेचे माजी अध्यक्ष माजी शिशिर धारकर आणि प्रेमकुमार शर्मा यांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.

पेण अर्बन सहकारी बँकेत आठ वर्षांपूर्वी घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. पेण अर्बन बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी नेमलेल्या विशेष लेखा परीक्षण पथकाने १२८ खाती बोगस असल्याचे आपल्या अहवालामध्ये नमूद केले होते. साडेसातशे कोटीहून अधिक रकमेचा हा घोटाळा असून १२८ बोगस कर्ज खात्यांद्वारे ठेवीदारांच्या पैशाची लूट करण्यात आली होती. पेण अर्बन सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्याचा फटका बँकेच्या सुमारे अडीच लाख ठेवीदारांना बसला. अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी यात गुंतविली होती. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने तपास सुरु केला होता. या प्रकरणी ईडीने शुक्रवारी रात्री बँकेचे माजी अध्यक्ष शिशिर धारकर आणि प्रेमकुमार शर्मा यांना अटक केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button