breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘पेट्रोल २०० रुपये झालं तरी चालेल पण काँग्रेस नको’, पुणेकर काकांचा व्हिडीओ व्हायरल

काँग्रेसच्या पुढाकाराने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात या बंदला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत पिंपरी चौकात निदर्शने केली. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रेडसेपरेटरमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. काही अपवाद वगळता शहरातील दैनंदिन व्यवहार सुरूच असल्याचे दिसून आले.

पुण्यामधील बंद दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पुण्यातील लक्ष्मी रोडवरील परिस्थितीचा आढवा घेतानाचा एका पत्रकाराचा हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर ५८ हजारहून अधिक लोकांनी पाहिला असून तीन हजारहून अधिक लोकांनी तो रिट्विट केला आहे. लक्ष्मी रो़डवरील पेट्रोल पंप बंद असल्याचे सांगत हा पत्रकार काँग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे आज पेट्रोल पंपही बंद असल्याचे सांगताना दिसतो. त्यानंतर हा पत्रकार जवळच उभ्या असणाऱ्या एका दुचाकीवरील पुणेकराकडे जात या बंदचा समान्यांना फटका बसत असून त्यांना याबद्दल काय म्हणाचे आहे जाणून घेऊयात असं म्हणत पुणेकर व्यक्तीची छोटी मुलाखत घेतो. हा पत्रकार त्या व्यक्तीला तुम्हाला काही त्रास आहे का असा प्रश्न विचारतो. या प्रश्नावर ही गाडीवरील व्यक्ती एकदम शांतेमध्ये, ‘काँग्रेसच त्रास आहे’ असं तीन शब्दातील उत्तर देताना दिसतो. त्यानंतर गोंधळलेला पत्रकार त्या व्यक्तीला काँग्रेसने सध्या भाजपमुळे महगाई वाढली आहे पेट्रोलचे भाव वाढलेत त्याबद्दल काय सांगाल असं विचारतो. यावरही तो व्यक्ती अगदी शांततेमध्ये, पेट्रोल १०० रुपये काय २०० रुपये असले तरी चालेल पण काँग्रेस नको असे उत्तर देतो.

 

Rushi Vyas@Rushivyas1994

People like these are the reason why Pune is the best city to live in India 😂😂

जिंकलस भावा

Ganesh shankar Singh@gssingh86

Bhai ne Dil Jeet liya. Petrol 200 Chalega lekin congress nahi chahiye. @TajinderBagga

सीधी बात नो बकवास

(Atal) Neeraj Sharma@Neeraj0702

सीधी बात नो बकवास 😂😂

पुण्यामध्ये काल भारत बंदमुळे अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पुणे शहरातील मार्केटयार्ड १० नंबर प्रवेशद्वारे, चित्रशाळा, पंपिंग स्टेशन, नळस्टॉप, गुजरात कॉलनी, महानगरपालिका, संघर्ष चौक आदी ठिकाणी बसेसची तोडफोड झाली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button