breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पॅसेंजर अडवणाऱ्या 13 महिलांवर गुन्हा

  • रेल्वे प्रशासनाची कारवाई

पुणे – पुणे-दौंडदरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाडीला घोरपडी येथे थांबा देण्यात यावा, या मागणीसाठी महिलांनी गाडीची चैन ओढली. यानंतर गाडीच्या इंजिनाला अडवे जाऊन आंदोलन करत रेल्वे थांबवून धरली. अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्या 13 महिलांवर रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर रेल्वे नियामानुसार महिलांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे ते दौंड प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या गाडीला घोरपडी येथे थांबा देण्याची मागणी काही प्रवाशी करत आहेत. त्यांची मागणी मान्य न झाल्याने त्यांनी सोमवारी पॅसेंजर गाडीची चैन ओढून गाडी थांबवून आंदोलन केले. मात्र, या प्रकारामुळे गाडीला विलंब होऊन गाडीच्या पाठीमागे येणाऱ्या सहा गाड्यांना उशीर झाला. यामुळे असंख्य प्रवाशांचे हाल झाले. यामुळे रेल्वेच्या वतीने या महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अनधिकृतपणे गाडीची चैन ओढून गाडी थांबविणे तसेच गोंधळ घातल्याने रेल्वे नियामानुसार कलम लावण्यात आले आहेत. त्यांना न्यायालयात हजर करुन 12 महिलांकडून प्रत्येकी 400 रूपये, तर एका महिलेला 500 रूपये दंड आकारण्यात आला आहे.
घोरपडी येथील रेल्वे मार्ग दोन्ही बाजुने व्यस्त होतो. त्यामुळे अशा ठिकाणी अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. पुणे विभागात 2017-18 या कालावधीत रेल्वे रूळ अनधिकृतपणे ओलांडताना 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर पाच जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगत प्रवाशांनी अशा प्रकारे गाड्या अडवून हजारो प्रवाशांचा वेळ वाया घालवू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button