पीडितेशी लग्न केल्यानंतरही आरोपीला सक्तमजुरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/08/rape.jpg)
पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगल जोगन यांनी केला होता. अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. तर न्यायालयीन कामकाजात
विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार के. बी. जगताप यांनी साह्य केले.
खटल्यात पीडित मुलगी, तिची आई, तपासी अंमलदार यांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडित मुलीच्या वयाचा पुरावा, डीएनए तपासणी अहवाल पुरावा म्हणून महत्त्वाचे ठरले. घटनेच्या वेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती. आरोपीने घटनेनंतर तिच्याबरोबर विवाह केला असला, तरी त्यामुळे घटनेचे गांभीर्य कमी होत नाही, असे सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
पीडिता आणि आरोपी राहत एकत्र
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची काही दिवसांनी जामिनावर सुटका झाली होती. दरम्यान, त्याने पीडितेबरोबर लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर दोघेही बरोबर राहत. सुनावणीसाठी दोघेही बरोबर न्यायालयात येत. मात्र, गुन्ह्याची मूळ फिर्याद दाखल असल्याने या प्रकरणाची सुनावणी झाली व आरोपीला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीला पुन्हा अटक करण्यात आली आहे.