पहिली ते दहावी मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी चार युट्यूब चॅनेल सुरु
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Untitled-2.png)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिली ते दहावी मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी चार युट्यूब चॅनेल सुरु केलेआहेत.याबाबतची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे. त्याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा लवकरच युट्यूब चॅनेल सुरु होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Capture-71.jpg)
वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटल्यानुसार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी चार युट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. त्याचबरोबर लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/2-47.jpg)
आता जिओ टीव्ही वर इयत्ता तिसरी ते बारावीसाठी एकूण १२ चॅनेल सुरु करण्यात आले आहेत. असे करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव असे राज्य असून ज्याने चार माध्यमांचे शैक्षणिक चॅनेल सुरु केले आहेत.