Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
पश्चिम घाटात गोगलगायीसंदर्भात संशोधनासाठी तेजस ठाकरेंना परवानगी, आशिष शेलार म्हणतात…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Ashish-Shelar-Tejas-Thackeray.jpg)
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी गोगलगायीसंदर्भात पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला पाठवलेला प्रस्ताव मान्य करण्यात आलेला आहे. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी अभिनंदन करणारे ट्वीट केलेले आहे.
“तेजस ठाकरे यांनी खेकडे, पालीनंतर गोगलगाईच्या संशोधनासाठी परवानगी मागितली आहे. त्याला वन्य जीव मंडळाने मंजुरी दिलेली आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. निसर्ग प्राणीमात्रेची निर्मिती विशिष्ट हेतूने करतो आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. त्यामुळे संशोधन आवश्यकच! महाराष्ट्राचा हा पुढाकार आनंददायीच!” अशा शब्दात शेलारांनी कौतुक केलेले आहे.