“पवार साहेब आज मला तुमची खूप आठवण येते”; चित्रा वाघ यांचे भावुक उद्गार
नाशिक |
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेची वारंवार मागणी करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या पूर्वी किशोर वाघ यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 12 फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना शरद पवारांच्या आठवणीने त्या भावुक झाल्या आहेत.
“माझ्या पतीवर गुन्हा दाखल केला, हे मला पत्रकारांकडून कळालं, काय केलं माझ्या पतीने, आमचे काही कारखाने नाहीत, गुन्हा दाखल केल्याचा साधा नोटीसही नाही, चौकशीसाठी स्वत: घरी येऊन नोटीस दिली मग आता काय लोक संपले पोलिसांचे, व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठवली”, अशी प्रतिक्रया चित्रा वाघ यांनी दिलेली आहे.
पतीवर गुन्हा दाखल झाल्यांनतर बोलताना पवारांच्या आठवणीनेचित्रा वाघ भावून होऊन म्हणाल्या, “पवार साहेब आज मला तुमची खूप आठवण येतेय. शरद पवार माझा बापाचं आहे. ५ जुलै २०१७ ला गुन्हा दाखल झाला आणि ७ जुलैला मला साहेबांनी बोलावून घेतलं. एफआयआरची कॉपी माझ्याकडे मागितली. साहेबांनी सगळं वाचलं. मला म्हणाले ‘यात तुझा नवरा कुठेच नाही.’ त्यानंतर केस झाली. अजूनही न्यायालयात केस सुरु आहे. आता एसीबी सर्वाचा एफआयआरच्या कॉपी देत आहेत. तर कृपया सर्वांना कळू द्या की माझ्या नवऱ्याने पैसे घेतले की नाही ते. माझा नवरा होता त्या ठिकाणी की नाही, माझा नवरा तिथे नव्हता. तरीही त्याच्या नावाने आज न्यायालयात केस दाखल केली आहे.”
वाचा- भारतात मागील 24 तासांत आढळले 16,488 नवे कोरोनाचे रुग्ण