breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परीक्षेच्या काळात मिशिदीवरील लाऊड स्पिकर बंद ठेवा, युवा सेनेची मागणी

नागपूर |महाईन्यूज|

परीक्षेच्या काळात मिशिदीवरचे लाऊड स्पिकर बंद ठेवण्यात यावेत, अशी मागणी युवा सेनाप्रमुख विक्रम राठोड यांनी केली. त्यासाठी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलंय.

सध्या परीक्षेचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यांच्या भविष्यासाठी हे महत्त्वाचे दिवस असल्यामुळे हा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलीय. परीक्षेच्या काळात कुटुंबांमध्ये टी.व्ही. आणि रेडिओही बंद ठेवतात. असं असताना दिवसातून पाच वेळा नमाज पठण केलं जातं. त्यामुळे त्याच्या आवाजाने विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात हे लाऊड स्पिकर्स बंद ठेवण्यात यावे अशी विनंतीही त्यांनी केलीय.

शिवसेनेच्या युवा नेत्याच्या या मागणीमुळे वाद होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत शिवसेना नेत्यांनी अशी भूमिका घेणं यात काही वेगळं समजलं जात नव्हतं. मात्र राज्यात महाआघाडीचं सरकार आल्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना या मागणीचं निवदेन दिलंय.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button