Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
पत्रकार, छायाचित्रकार मारहाण प्रकरणी मुंबई पोलिसांचा निषेध
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी
छायाचित्रकार आशिष राजे यांच्यावर नागपाडा येथे चित्रीकरण करण्यास गेल्यानंतर मुंबई पोलिसांच्या ४ अधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्या निषेधार्थ मुंबई न्यूज फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने प्रेस क्लब, मुंबई येथे जाहीर निषेध नोंदविला.
तसेच, जोपर्यंत मारेकरी पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत पोलिसांच्या सर्वच कार्यक्रमांवर पत्रकारांनी बहिष्कार घातला आहे.
नँशनल युनियन आँफ जर्नालिस्ट महाराष्ट्रच्या वतीने अध्यक्ष शीतल करदेकर यांनीही निषेध व्यक्त करत याला पाठिंबा दिला.