पक्षात आणि कुटुंबात उभी फूट, सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी
![Supriya Sule 'Parliament Gem' for the seventh time; Out of 11 MPs, 4 MPs from Maharashtra will be honored](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Supriya-Sule.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंब फुटल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये याबाबत भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे पत्रकारांसमोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यात पाणी दिसलं. सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी यावर भाष्य करणं टाळलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडल्यानंतरच मी बोलेल असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं.
![](https://pbs.twimg.com/profile_images/1105775557495525378/ZrT5BJ7Y_normal.png)
LIVETV सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस , पक्ष आणि कुटुंबात फूट http://tv9marathi.com/live-tv
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पहिल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये पक्ष आणि कुटुंब फुटल्याचं सांगितलं. त्यानंतर काही वेळातच त्यांनी आपलं दुसरं स्टेटस देखील टाकलं. यात त्यांनी अजित पवारांच्या या निर्णयावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.