पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार पूर्ण करण्यासाठी आमदार महेश लांडगेंचे योगदान : देवेंद्र फडणवीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/1580374304377.jpg)
भोसरी| महाईन्यूज | प्रतिनिधी
भारताला महाशक्तीत रूपांतर करायचे असेल, तर महिला सक्षमीकरण होणे गरजेचे आहे, असे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले होते. तोच निर्धार करत आमदार महेश लांडगे यांनी सुरु केलेला ‘इंद्रायणी थडी’ हा उपक्रम महिलांसाठी सर्वोत्तम व्यासपीठ ठरला, असे मत माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भरविलेल्या ‘इंद्रायणी थडी जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, संयोजिका व शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा महेश लांडगे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, राहुल कुल, माजी आमदार शरद सोनवणे, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, कामगार नेते सचिनभैया लांडगे, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राची संस्कृती जपली जावी. राज्यातील विविध प्रांतातून आलेल्या महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने भोसरी येथे शिवांजली सखी मंचच्या माध्यमातून गुरुवारी (दि.३० जानेवारी) ते रविवारी (दि.२ फेब्रुवारी) पर्यत ‘इंद्रायणी थडी’ जत्रा भरविण्यात आली आहे.