नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल, हसन मुश्रीफ यांचा दावा
![Workers should not migrate, the state government is behind the workers - Hasan Mushrif](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Hasan-Mushrif-1.jpg)
अहमदनगर : “नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल”, असा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मुश्रीफ आज (9 जुलै) अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी हा दावा केला. त्यासोबत मुश्रीफ यांनी कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या संगमनेरमध्ये एक बैठक घेत कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
“नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल. सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना रुग्णसंख्या कमी होईल”, असा विश्वासही हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.“मुंबई, पुण्याहून आलेल्या लोकांमुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. लक्षणे आढळल्यास कोरोना हेल्थ केअर सेंटरला जाऊन तपासणी करावी. जिल्ह्यात संगमनेर तालुक्याचा कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक नऊ टक्के आहे”, असंही त्यांनी सांगितले.“जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व्हे वाढवण्यासोबत कोरोना चाचण्या वाढवाव्यात”, असे आदेशही हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.