नॉन ईएमव्ही व्यवहारास पीएनबीच्या कार्डधारकांना 1 फेब्रुवारीपासून बंदी
![Non-EMV transactions banned from PNB cardholders from 1 February](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/pnb_20.jpg)
मुंबई- खातेदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने आपल्या नियमात काही बदल केले आहेत. त्यानुसार येत्या 1 फेब्रुवारीपासून पीएनबीच्या डेबिट कार्डधारकांना नॉन ईएमव्ही एटीएममधून कोणताही व्यवहार करता येणार नाही.
म्हणजे त्यांना अशा एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत आणि आपल्या खात्यातील बॅलन्सही तपासता येणार नाही. क्लोनिंग कार्डद्वारे बँकेच्या कार्डधारकांची एटीएममधून फसवणूक केली जाते. त्यांची फसवणूक टाळण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने नॉन ईएमव्ही एटीएममधून कोणतेही व्यवहार करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसे ट्विट बँकेने केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार मॅग्नेट्राईप कार्ड यापूर्वी बंद करण्यात आली आहेत. त्यांच्या जागी ईएमव्ही चीप असलेली कार्ड आली आहेत. ती अधिक सुरक्षित आहेत. नॉन ईएमव्ही एटीएम मशीनमध्ये व्यवहार पूर्ण होईपर्यंत हे कार्ड बाहेर काढता येत नाही. त्यावर रेडींग सुरू असते. त्यामुळे खातेदारांची फसवणूक होण्याचा संभव कमी आहे. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेने हे पाऊल उचलले आहे.