नाही तर उरलेली चड्डी पण काढून घेवू – मनसेचा मुख्यमंत्र्याना इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Raj-cm.jpg)
मुंबई : कोल्हापूरमध्ये रविवारी शिवसेना आणि भाजप युतीच्या पहिल्या प्रचारसभेचा नारळ फुटला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर टीका करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘पोपट’ बोलून त्यांच्यावर तोफ डागली. यावर आता मनसेनेही प्रत्युत्तर दिले आहे. ‘स्वतः अर्धी चड्डी घालणाऱ्यांनी आमच्या कपड्यांची काळजी करू नये, नाहीतर उरलेली चड्डी पण काढून घेण्यात येईल’, असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केले आहे.
स्वतः अर्धी चड्डी घालण्यार्यानी आमच्या कपड्यांची काळजी करू नये नाहीतर उरलेली चड्डी पण काढून घेण्यात येईल
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 25, 2019
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे एकमेकांवर टीकास्त्र सुरू झाले आहे. मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे राज यांनी जाहिर केले. मात्र यंदाच्या निवडणूकीत भाजपविरोधी प्रचार करण्याचा आक्रमक पवित्रा राज यांनी घेतला असून त्यांच्या प्रत्येक भाषणातून ते भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत.