breaking-newsमहाराष्ट्र

नाल्याच्या पुरात बहीण-भाऊ वाहून गेले

वाशीम जिल्हय़ातील वाघी बु. येथील घटना

अकोला : मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात शाळकरी सख्खे बहीण-भाऊ वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी वाशीम जिल्हय़ाच्या मालेगाव तालुक्यातील वाघी बु. गावात घडली. दोघांचाही शोध घेण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत युद्धस्तरावर सुरू होते.

शिरपूर जैन येथून जवळच असलेल्या वाघी बुद्रुक परिसरात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे परिसरातील नाल्याला पूर आला. रस्त्यांवरून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत होते. दरम्यान, इयत्ता दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या पारस बाळू पवार (७) या आपल्या भावाला शाळेतून घरी आणण्यासाठी आठव्या वर्गात शिकणारी पूजा बाळू पवार (१४) ही शाळेत गेली होती. शाळेतून वाघी बु. येथील घरी जाण्यासाठी दोघेही बहीण-भाऊ निघाले. या दरम्यान मार्गातील नाल्यातून जाण्याचा प्रयत्न करत असताना दोघे बहीण-भाऊ  नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस व तहसील प्रशासनाला दिली. प्रशासनाने घटनास्थळ गाठून मदत कार्य सुरू केले. मालेगावचे तहसीलदार रवि काळे यांनी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना घटनेची माहिती दिली. बचाव पथक रेस्क्यू बोट, रुग्णवाहिका, शोध व बचावाचे साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले. युद्धस्तरावर दोघांचाही शोध घेण्यात येत आहे. परिसरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button