breaking-newsमहाराष्ट्र

नगराध्यक्षांनी हात जोडून उभे राहण्याची शिक्षा दिल्याने शिपायाला हार्टअटॅक

नगराध्यक्षांनी हात जोडून उभे राहण्याच्या दिलेल्या शिक्षेमुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा नगरपंचायतीमध्ये घडला. सुरेश जाधव असे रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना गुरूवारी घडली. दरम्यान, नगराध्यक्षा ज्योत्सना चराटी यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. आपल्याला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी कट रचल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सुरेश जाधव हे आजरा नगरपंचायतमध्ये शिपाई म्हणून कामाला आहेत. भाजपा पुरस्कृत नगराध्यक्षा ज्योत्सना चराटी यांनी जाधव यांना नाश्ता आणण्यास सांगितले होते. नाश्ता देण्यास उशीर झाल्याने त्यांनी जाधव आणि आणखी एका शिपायाला हात जोडून उभे राहण्याची शिक्षा केली. त्याचवेळी जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी जाधव यांना त्वरीत रूग्णालयात दाखल केले. जाधव हात जोडून उभे राहिल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे. दरम्यान, चराटी यांनी असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे सांगत आपल्या बदनाम करण्यासाठी विरोधकांनी हे कुंभाड रचल्याचा आरोप त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button