breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक! 12 तासांनंतर पहिला मृतदेह काढला बाहेर, 16 जणांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

रायगड : रायगड जिल्ह्यातीव महाड इथे तारिक गार्डन नावाची 5 मजली इमारत सोमवारी संध्याकाळी कोसळून मोठी दुर्घटना घडलेली आहे. तब्बल 12 तासांपासून पोलीस, एनडीआरएफच्या मदतीनं मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी तर ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ढिगाऱ्यात पहिला मृतदेह सापडलेला आहे. हा मृतदेह गॅस कटरने स्लॅब कापून काढण्यात आलेला आहे.

बचाव पथकाने जेसीबीच्या मदतीनं 8 जणांना ढिगाऱ्याखालून काढलं. जखमींना स्थानिक रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल कऱण्यात आलेलं आहे. तर ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीचा पहिला पिलर खचला तेंव्हा बहुतांश तरुण इमारतीच्या बाहेर पडले अशीही प्राथमिक माहिती मिळालेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button