Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
धक्कादायक… मुंबईतील कोरोना रुग्णांचे मृतदेह गायब होत आहेत; भाजपाचे किरीट सोमय्या राज्यपालांच्या भेटीला!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/4-5.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य यंत्रणा आता हतबल झाली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत रोज कोरोना रुग्णांचे मृतदेह गायब होतायत, बेवारस म्हणून जाळले जातायत, अशा सात दुर्दैवी कुटुंबियांची कैफियत भाजपा नेते किरीट सोमस्या, अतूल भातखळकर यांनी राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची राजभवन येथे भेट घेतली. जनतेचे गाऱ्हाणे मांडले. त्यामुळे आता गायब झालेले मृतदेह कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.