Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
धक्कादायक! पुराच्या पाण्यात उडी मारणाऱ्या तरुणाचा मृतदेह तब्बल दोन दिवसांनी सापडला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/dead_body_1_192915_730x419.jpg)
रायगड: पुराच्या पाण्यात उडी मारण्याचे साहस करणाऱ्या 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. रायगडमध्ये जानसई नदीत उडी मारल्यानंतर वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडलेला आहे. म्हसळा गावातून वाहून गेलेल्या बदर हळदे याचा मृतदेह आज सापडलेला आहे. माणगावची साळुंखे टीम, दिवे आगारची वसिम फकजी टीम, श्रीवर्धन, म्हसळा, खोपोली अशा विविध भागातील रेस्क्यू टीम्स प्रयत्न करत होत्या.
अखेर पोलिसांच्या सहकार्याने दिवेआगारच्या टीमने आज (7 ऑगस्ट) पहाटे सहा वाजता निगडी गावच्या हद्दीत जानसई नदी किनारी झाडी झुडपात अडकलेला मृतदेह काढला आहे. या शोध पथकामध्ये तौसिस अफराद, नासिर साखरकर, मोझम मालपेकर, मुझ्झमिल गोठेकर, फौजान साखरकर आणि वसिम फकजी यांचा समावेश होता.