breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दौैंडमधील अटलबिहारी वाजपेयींच्या आठवणींना उजाळला

दौैंड – दौैंड शहरातील महात्मा गांधी चौैकात २ सप्टेंबर १९८३ रोजी  झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. गांधी चौैकात अटलजींचे विचार ऐकण्यासाठी दौैंड, इंदापूर, बारामती, श्रीगोंदा, येथून मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकंदरीतच गर्दी पाहता यावेळी २0 स्पिकर लावण्यात आले होते. या सभेच्या संदर्भात तत्कालीन भाजपाचे शहराध्यक्ष प्रकाशजी बोगावत, भाजपाचे जिल्हा सचिव मोहनलालजी भंडारी यांनी माहिती देताना सांगितले की, दौैंड तालुक्याचे आमदार राजारामबापू ताकवणे आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांच्या पुढाकाराने ही सभा झाली होती की जेणेकरुन भारतीय जनता पार्टीच्या सदस्य संख्येत वाढ व्हावी म्हणून. यावेळेला दौैंड तालुका भाजपाच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना पाच लाख रुपयांचा निधी पक्ष विकासाठी देण्यात आला होता. व्यासपीठावर येण्यापूर्वी अटलजी जुन्या रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ आले. त्यावेळेस त्यांची नजर कुरकुंभ मोरीजवळ असलेल्या उंच पादचारी पूलावर गेली. त्यांच्या या दृष्टीचा संदर्भ घेत ते ४५ मिनिटांच्या जाहीर भाषणात म्हणाले होती की, रेल्वे मोठ्या प्रमाणावर खर्च करते मात्र कुठल्याही गोष्टीचे नियोजन नसते. मोठ्या प्रमाणावर लोखंडी पायऱ्या असलेल्या या पूलावरुन तरुणांची देखील दमछाक होईल तर वयोवृद्ध माणसांचे काय? असे सांगून शेतकरी, सर्वसामान्य माणूस यासह भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणे स्पष्ट केली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button