देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसून ‘मॉडेल’, कन्हैय्या कुमारची टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/28.jpg)
ठाणे |महाईन्यूज|
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री नसून मॉडेल आहेत, अशी टीपण्णी त्यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी मॉडेल स्वरुपातील फडणवीस यांचे जुने फोटो व्हायरल झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यासाठी, कन्हैय्या कुमार यांनी आवर्जुन उपस्थिती दर्शवली. अर्ज भरतेवेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कन्हैय्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
आजचे राजकीय वातावरण योग्य नाही. जेव्हा शेतकरी आत्महत्या दुष्काळ याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले असता, ते फोटोशूट करण्यात व्यस्त होते. असं वाटत होतं, जणू महाराष्ट्राने मुख्यमंत्री निवडला नसून मॉडेल निवडला आहे, असे म्हणत मार्क्सवादी पक्षाचे नेते कन्हैय्या कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.
मुख्यमंत्री स्वत:ला स्मार्ट दाखविण्याचा प्रयत्न करतात, असे म्हणत कन्हैय्या यांनी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्यांवर टीका केली. तसेच, महाराष्ट्रात जे लढण्याचे स्पिरीट आहे, ते संपवले जात असल्याचा आरोपही कन्हैय्या यांनी केला.