Breaking-newsमहाराष्ट्र
दिवेआगर किनाऱ्यावर पसरली शिंपल्यांची चादर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/deveagaar-new-1.jpg)
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर सध्या शिंपल्यांचा सडा पसरला आहे. वायू वादळामुळे हजारोंच्या संख्येने शिंपले किनारपट्टीवरील भागात वाहून आले आहेत. हे शिंपले वेचण्यासाठी स्थानिकांनी समुद्र किनाऱ्यावर गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. .
अरबी समुद्रात आठवडभरापुर्वी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्र खवळलेला होता. परिणामी समुद्री वातावरणात बदल झाला व या बदललेल्या वातावरणामुळे अजस्त्र लाटा समुद्रात व किनाऱ्यावर धडकत होत्या. समुद्रातील उसळणाऱ्या लाटा किनाऱ्यावर येत असल्याने समुद्रातील छोटे जीवजंतू हे देखील समुद्र किनारी लाटांद्वारे वाहून आलेले आहेत. वायू चक्रीवादळाच्या तडाख्याने आलेल्या लाटांच्या वेगाने हजारो शिंपले समुद्र किनारी वाहून आलेले आहेत. समुद्रातील वादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावर शिपल्याचा सडा पसरलेला दिसत आहे.