दाभोळकर, पानसरे हत्त्येचा तपास लावण्यात मुख्यमंत्री फेल – उर्मीला मातोंडकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/807225-urmila-matondkar.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे या विचारवंतांची दिवसाढवळ्या हत्त्या झाली. गेल्या साडेचार वर्षात 11 खात्यांचा कारभार संभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणांचा तपास लावता आला नाही, अशी सणसणीत टिका प्रसिध्द अभिनेत्री उर्मीला मातोंडकर यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना केली आहे.
भाजपची आयटी मशिनरीज माझ्या विरोधात काम करत आहे. गेली 27 वर्षे बॉलीवूडमध्ये काम करताना माझ्यावर एवढ्या खालच्या पातळीवर टिका-टिपन्नी कोणीच केली नाही. गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर मी अॅक्टीव्ह आहे. एकही निगेटिव्ह कॉमेंट आजपर्यंत आलेली नाही. ज्यादिवशी मी राजकारणात आले. त्या दिवसापासून माझ्या पोस्टला निगेटिव्ह कॉमेंट्स येत आहेत. यामागे भाजपच्या आयटी मशिनरीज पाहणा-या टिमचा हात आहे, असेही मातोंडकर म्हणाल्या.
लोकशाहिमध्ये दुस-याच्या आयुष्याची दखल घेण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही. कोणी काय करावं, कोणी काय करून ये, हे सांगण्याचा अधिकार भाजपवाल्यांना कोणी दिला?. माझ्या धर्मावर प्रश्न विचारणारे हे कोण आहेत?. फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर हजारो कॉमेंट्स येत आहेत. त्यात टिकात्मक प्रश्न विचारले जात आहेत. ते विचारण्याचा अधिकार यांना कोणी दिलेला आहे?. भाजपने गेल्या पाच वर्षात देशभरामध्ये सुडाचं आणि द्वेशाचं राजकारण केलं आहे, याच्या विरोधात मी आवाज उठवणारच, असेही मातोंडकर मुलाखतीत म्हणाल्या.