“त्या’ बलात्कारपिडीत मुलीचा तुर्त गर्भपात नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/bombay-high-court7.jpg)
मुंबई – त्या बलात्कारपिडीत अल्पवयीन मुलीच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने गर्भपाताच्यावेळी तिच्या जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने तुर्त तरी तिचा गर्भपात करता येणार नाही. मात्र, तिच्या गर्भाला गंभीर आजार असल्याने तिच्या जिवतास धोका असल्याने गर्भपात करणे जरूरीचे आहे, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आल्याने न्यायालयाने गंभीर दखल घेतली.
10 दिवसानंतर तिची पुन्हा वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयालने दिले. तर दुसऱ्या अल्पवयीन मुलीच्या वैद्याकिय अहवालानंतर गर्भपाताला न्यायालयाने परवानगी देताना डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले. 21 आठवडे उलटून गेलेल्या दोघा बलात्कारपीडीत मुलींच्या वतीने उच्च न्यायालयात गर्भपाताला परवानगी मिळावी म्हणून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या याचिकांवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.