टाटा मोटर्सच्या जागतिक विक्रीत 39 टक्क्यांची वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/478405-tata-motors-1.jpg)
नवी दिल्ली – एप्रिलमध्ये टाटा मोटर्सच्या जागतिक पातळीवरील विक्रीत 39 टक्के वाढ झाली आहे. 1,02,297 इतक्या गाड्यांची विक्री झाली असून यात जग्वॉर लॅंड रोव्हरची विक्रीही समाविष्ट करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या एप्रिलमध्ये 73,691 इतकी विक्री झाली होती. टाटाच्या कमर्शिअल गाड्यांची जागतिक पातळीवर होलसेल विक्री दुप्पटीपेक्षाही जादा झाली. त्याची आकडेवारी 39,678 पर्यंत पोहोचली असून या अगोदर एप्रिल 2017 मध्ये 18,844 इतक्यापर्यंत झाल्यांची नोंद आहे.
प्रवासी गाड्यांची जागतिक विक्री 14 टक्क्यांनी वाढल्याची नोंद केली असून मागील महिन्यात 62,619 होती. जी 2017 रोजी 54,847 होती. होलसेल खरेदी करण्यात आलेल्या गाड्याचे प्रमाणही जास्त राहिल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, टाटा मोटर्स एवढ्यावरच समाधानी न होता. समूहातील या क्षेत्राचा वाटा अधिक वाढावा यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहेत.