जिजाऊंची जयंती, जन्मोत्सवासाठी सिंदखेडराजात जोरदार तयारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/8-7.jpg)
बुलडाणा |महाईन्यूज|
जिजाऊ जन्मोत्सवासाठी जिजाऊ सृष्टी सज्ज झाली आहे. चारशेहून अधिक बुक स्टॉल उभे करण्यात आले आहेत. दोनशेच्यावर खाद्यपदार्थाचे स्टॉल लागणार आहेत. या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले या कार्यक्रमाला खास उपस्थित राहणार आहेत.
12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी सिंदखेड राजा येथील राजवाड्यासह जिजाऊ सृष्टी सज्ज झाली आहे. जिजाऊ सृष्टीवर भव्य अशा बुक स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी चारशेच्यावर बुक स्टॉल लागणार आहे. तर 200 हून अधिक स्टॉल हे खाद्यपदार्थांसाठी असणार आहेत. 3 जानेवारीपासून ते 12 जानेवारी पर्यंत हा कार्यक्रम साजरा होत असतो. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिनापासून तर 12 जानेवारीला जिजाऊंच्या जन्मोत्सवापर्यंत या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात. 12 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीराजे भोसले या जन्मोत्सवाला खास उपस्थित राहणार असून महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत..
दरवर्षी जगभरातून लाखोचा संख्येने जिजाऊ भक्त सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुद्धा जिजाऊ भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. सिंदखेडराजा जिजाऊ भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. राजे लखोजीराव जाधव यांचा राजवाडा रंगरंगोटी करत सजवण्यात आला आहे. या ठिकाणी असलेले जिजाऊंचे जन्मस्थळ सुद्धा सजवण्यात आले आहे. त्यामुळे जिजाऊ भक्तांना रांगेत उभे राहून जिजाऊंचे दर्शन द्यावे लागणार आहे.