Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘जिंतूर बाजार समितीचा प्रश्न मोठा नाही’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संजय जाधवांना फोन, राजीनामा मागे घेण्याची सूचना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Uddhav-Thackeray-and-sanjay-jadhav.jpg)
औरंगाबाद: परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव नाराज आहेत. या नाराजीतून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा पाठवलेला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना फोन करुन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांच्याशी फोनवर बोलताना परभणीतील स्थानिक पातळीवर पक्षाशी संबंधित काय समस्या आहेत, यावर चर्चा केली आहे. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रश्न सोडवला जाईल. तो तितका फारसा मोठा प्रश्न नाही, अशी समजूत घालून खासदारकीचा राजीनामा मागे घेण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना दिलेली आहे. त्याअनुषंगाने संजय जाधव राजीनामा मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.