जळगाव घटनेचा शहर राष्ट्रवादीकडून निषेध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/RASHTRAWADI-FLAG.jpg)
- शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
पुणे – जळगाव येथे अल्पवयीन दलित मुलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधाचे निवेदन शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना शुक्रवारी दिले.
यावेळी जयदेव गायकवाड, महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे, प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, अशोक राठी, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात विहीरीत पोहोल्यामुळे मातंग समाजातील दोन तरुणांना विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. फुले, शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वाकडी गावात घडलेली ही घटना संतापजनक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. उना, राजकोटनंतर आता महाराष्ट्रात देखील दलितांवरील अत्याचार करण्याचे प्रकार वाढले आहेत. भाजप शासीत राज्यांमध्ये अशा घटना घडताना दिसतात; परंतु सरकार त्या रोखण्यासाठी पावले उचलत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.