breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती उदयनराजे भोसले माझ्या मुलासारखे : खासदार श्रीनिवास पाटील

सातारा । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

उदयनराजे यांचे वडील माझे मित्र होते. ते मला मुलासारखे आहेत त्यामुळे मीच त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता कुठेतरी पाय रोवून एका पक्षात रहा. सामान्य माणसाच्या जीवनात डोकावून नव्याने उभे राहण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही वडिलकीच्या नात्याने दिला असल्याचे सातार्‍याचे नूतन खासदार श्रीनिवास पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

बारामती येथे खा. पाटील यांनी खा. शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी दिलखुलास संवाद साधला. खा. शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना तीन वेळा लोकसभेला उमेदवारी दिली. एक वेळ त्यांच्या वाढदिवसाला कोणीही आमदार जायला तयार नव्हते. त्यावेळी खा. शरद पवार स्वत: सर्व आमदारांचा विरोध डावलून त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले. खा. पवार यांनी एवढा पाठिंबा  उदयनराजेंना दिला. विधानसभा निवडणुुकीच्या पार्श्वभूमीवर ते खा. शरद पवार यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांनी मला कुठेही प्रचार करायला सांगा मी तयार आहे, असा शब्द पवार यांना दिला. सकाळी असे बोलले व संध्याकाळी ते भाजपमध्ये गेले. किती सहन करायचे या माणसाचे. यावर शरद पवार यांची काही प्रतिक्रिया नाही, पण निदान एकदा म्हणायचं तरी मला जायचं आहे. पण त्यांनी तसंही काही सांगितल नाही. त्यांनी लादलेली लोकसभा पोटनिवडणूक पसंत न पडल्याने लोकांनीच निवडणूक  हातात घेतली. 

पवार यांनी मला सांगितले की कोणीही उदयनराजेविरूध्द लढायला तयार नाही. तेव्हा श्रीनिवास कागदपत्र गोळा करा आणि फॉर्म भरा. लोकांनाही माझ्या उमेदवारीची बातमी कळताच लोकांच्या भेटीचा जोर वाढला होता. मी विजयी झाल्यानंतर शरद पवार यांनी सातार्‍यात येवून भेट घेणार असल्याचे सांगितल्यानंतरही लोक भेटण्यासाठी आतुर होते इतका सातार्‍यातील जनतेचा पवार यांच्यावर विश्वास आहे.

सातार्‍यातील सभेत शरद पवार पावसात भिजत असताना तरूण पोरं पावसात कुडकुडत होती. त्यावेळी शरद पवार यांनी का कू केलं नाही. आतापर्यंत अनेक फोन आले की सातार्‍याच्याच सभेचा परिणाम राज्यभरात झाला आहे. काही दिवसांपूर्वी 10 येतील 5 येतील असे बोलले जायचे. जिथं जाईल तिथं शरद पवारांचा करिष्मा व काँग्रेसची साथ अशीच चर्चा होती.  यामध्ये काँग्रेसच्या कुठल्याच नेत्याचे नाव घेत नाही फक्त पवारांचीच चर्चा सुरू आहे, असेही खा. पाटील म्हणाले. 

यावेळी शरद पवार म्हणाले, कराड आणि सातारा माझ्या खात्रीचा मतदारसंघ आहे. जसा मला बारामतीत पाठिंबा मिळतो तसा तेथे मिळतो. त्यांनी घेतलेल्या काही निर्णयात संधी दिली. त्यावेळी जर काही घडलं तर आपल्याला अस वाटत की आपण त्यांना संधी दिली पण असं घडल. उदयनराजेंनी घेतलेल्या निर्णयानंतर सातारकरांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे साताकरांचे आभार मानावे तेवढे कमीच असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली. यावेळी सुप्रिया सुळे, सारंग पाटील उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button