चंपा, टरबुज्या म्हटलं तर पलटवार करा – चंद्रकांत पाटील
![Now ‘paint’ from cow dung; BJP boosts rural economy!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/chandrakant-dada-patil.jpg)
भाजपा कार्यकर्त्यांना आक्रमक उत्तर देण्याचे आदेश
मुंबई |महाईन्यूज|
सत्ताधाऱ्यांनी मृतदेहाच्या बॉडी बॅगचा भ्रष्टाचार सुरु केला, मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केले आहे. कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला आहे, कोरोना काळातील भ्रष्टाचार उघड करावा लागेल, खूप मोठी राजकीय लढाई लढावी लागणार आहे. विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे कोणी टरबुज्या म्हणतं, चंपा म्हणतं पलटवार केला पाहिजे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आक्रमकपणे उत्तर देण्यास सांगितले.
भाजपा प्रदेश पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते, यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोनामध्ये लोकांना मदत करुन राज्य सरकारविरोधात आंदोलन केले, आगामी काळात विविध मुद्द्यांवरुन पक्षाला आंदोलन करावं लागेल, कोरोनाच्या लढाईत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी मदत करावी, लोकांच्या अडीअडचणीला धावून जा, सामान्य माणसांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरुन आंदोलन करावं लागणार आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत प्रचंड आक्रमक पद्धतीने विरोधी कार्यकर्त्यांना उत्तर द्यावा, शांत बसणं म्हणजे मान्य करणे असं होतं, शब्द जपून वापरा जेणेकरुन ते मागे घ्यावं लागणार नाही. शब्दांची धार वापरा, कोरोनाच्या परिस्थितीचं भान ठेवत आक्रमक राहिलं पाहिजे असे आदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.