चंद्रपूर कोरोना अपडेट, एकाच दिवशी 11 रुग्ण कोरोनाबाधीत
चंद्रपूर | जिल्ह्यामध्ये रविवारी एकाच दिवशी 11 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. यामुळं आता जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या 39 झाली आहे. यामध्ये मुंबईवरून आलेला शास्त्री नगर चंद्रपूर येथील 31 वर्षाच्या पुरुष, नवी दिल्लीवरून गडचांदूर येथील 27 वर्षाचा व्यक्ती, जळगाववरून आलेला नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 36 वर्षाचा व्यक्ती, यवतमाळ वरून आलेला नागभीड तालुक्यातील पूनघाडा रिठ या गावचा 36 वर्षीय व्यक्ती, ओडीसा राज्यातून आलेला नागभीड तालुक्यातील विजापूर या गावचा चाळीस वर्षीय पुरुष, तसेच यवतमाळ येथून आलेला नागभिड शहरातील 45 वर्षाचा पुरुष, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील दोन व्यक्ती सह ब्रह्मपुरी येथील covid-19 केअर सेंटर मधील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या एकूण पाच व्यक्तींचा समावेश आहे.
एकाच दिवशी 11 रुग्ण पोजीटिव्ह येण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळं प्रशासनात खळबळ उडाली. चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधीत ), 13 मे ( एक बाधीत), 20 मे (एकूण 10 बाधीत ) 23 मे ( एकूण 7 बाधीत ) व 24 मे ( एकूण बाधीत 2 ) 25 मे ( एक बाधीत ) 31 मे ( एक बाधीत ) 2 जून ( एक बाधीत ) 4 जून ( दोन बाधीत ) 5 जून ( एक बाधीत ) 6 जून ( एक बाधीत ) 7 जून ( एकूण 11 बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोनाबाधीत 39 झाले आहेत. आतापर्यत यातील 22 बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 39 पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 17 आहे.