घारापुरी बेटांवर ८ जून रोजी पर्यटकांचा महाकुंभ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/jaykumar-rawal-twitt.jpg)
मुंबई : पर्यटन विभागाच्यावतीने नव-नवीन पर्यटन स्थळे विकसित करून ते जगासमोर मांडण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या घारापुरी बेटाला देश-विदेशातील पर्यटकांसमोर मांडण्यासाठी ८ जून २०१८ रोजी विशेष आयोजन करण्यात आल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या प्रयत्नाने घारापुरी बेटावर नुकतीच वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यटन विभागाच्यावतीने पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बेटावरील जगप्रसिद्ध एलिफंटा गुंफा येथील समुद्र, पहाड, जंगल आदींचा पर्यटकांना आनंद घेता यावा व या बेटांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून देण्यासाठी ‘एअर बीएनबी’ या जगविख्यात कंपनी सोबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सामंजस्य करार केला आहे. याचाच भाग म्हणून ८ जून २०१८ रोजी घारापुरी बेटावर देश -विदेशातील पर्यटकांसाठी पर्यटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.